सुंदर....
शिंपल्यातल्या मोत्यांसारखही
निर्मळ....
झर्याच्या खळखळत्या पाण्यासारखी
पवित्र....
गंगेच्या पहिल्या प्रवाहासारखी
निरागस....
झोपलेल्या अर्भकाच्या हास्यासारखी
गोंडस....
पायात खेळणार्या मांजराच्या पिल्लासारखी
अव्यक्त....
मुठीत लपविलेल्या सोनचाफ्यासारखी
दुखावलेली.....
काच रूतलेल्या पायासारखी
अस्वस्थ....
भूगर्भातल्या असंख्य प्रस्तरांसारखी
गोंधळलेली.....
जत्रेतल्या हरवलेल्या मुलासारखी
भरकटलेली.....
वार्याने उडून लावलेल्या पाचोळयासारखी
दुरावलेली....
कधीही भेटू न शकणार्या दोन डोळ्यांसारखी
तुटलेली....
न सांधता येणार्या दगडावरल्या भेगेसारखी
संपलेली.....
विझून शांत झालेल्या चितेसारखी....
: तेजाली 24/05/2014
छायाचित्र सौजन्य : ओमकार वाबळे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा