सुट्टीसाठी जेव्हा इस्तंबूल नक्की झालं तेव्हा तिकडे मांजरी भेटतील हे अपेक्षित होतंच. पण गंमत म्हणजे त्या संपूर्ण टर्कीभर आहेत. लोक मनापासून त्यांची काळजी घेतात.
चीनमधून युरोपात जाणारा रेशीम मार्ग आपल्याला माहिती आहेच. हे शहर याच मार्गावरचं एक प्रमुख ठिकाण होतं. एकेकाळी हे एक महत्त्वाचं बंदर होतं. भौगोलिक घडामोडींमुळे इथला समुद्र मागे हटला आणि बंदर बंद पडल्याने व्यापार मंदावला आणि शहराची कळा पालटली.
त्याचे भव्य दगडी अवशेष बघताना आपण विस्मित होतो. याच्या अवती भवती अनेक गोष्टी आहेत. तिथे पोचताना झालेली यातायात हा आणखी वेगळा विषय. ते नंतर लिहीन! तो पर्यन्त love cats, love travelling and love yourself!!!
#turkey #catsofinstagram #catsinturkey #ephesusruins #travel #solotravel
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा